Shivgandha

Sale!

Zadezudpe Lawa, Pashudhan Jagwa marthi madhye”झाडेझुडपे लावा, पशुधन जगवा” (Zadezudpe Lawa, Pashudhan Jagwa)

Original price was: ₹299.00.Current price is: ₹270.00.

पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन उद्योग आहे. आधुनिकपूर्व काळापर्यंत, घराच्या परिसरात किंवा गावाच्या परिसरातील मोकळ्या माळरानातील गवतांवर तसेच झाडाझुडपांवर हे पशू सहजपणे पोसले जात होते. आधुनिक काळात मात्र वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या मनुष्यसंख्येची गरज भागवायला लागणारे वाढते पशुधन जोपासण्यासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी चाऱ्यासाठी गवतांसोबतच झाडेझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा आणि फायदेशीर पूरक उद्योग आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणारे पुस्तक : चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय. लागणारी जमीन, हवामान, लागवड, पीक वाढीचा कालावधी, कापणी, साठवण अशी सर्वांगीण माहिती. पाऊसपाण्याच्या प्रमाणानुसार कोणती झाडे लावावी याविषयी मार्गदर्शन. ओल्या आणि कोरड्या चाऱ्यातील विविध पौष्टिक गुणांची शास्त्रीय माहिती. झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग चारा किंवा मूरघास बनवण्यासाठी कसा करावा याविषयी सूचना. झाडाझुडपांची लागवड कमी आकाराची / उंचसखल / तुकड्यातुकड्यांची जमीन वापरूनही करता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक झाडेझुडपे लावा पशुधन जगवा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Zadezudpe Lawa, Pashudhan Jagwa marthi madhye”झाडेझुडपे लावा, पशुधन जगवा” (Zadezudpe Lawa, Pashudhan Jagwa)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top