ट्रेडिंग इन द झोन मध्ये डग्लस, ट्रेडर्स सातत्याने फायदेशीर नसण्याची मूलभूत कारणे शोधून काढतात. ते ट्रेडर्सना खोलवर रुजलेल्या अयोग्य मानसिक सवयींवर मात करण्यास मदत करतात. डग्लस बाजारपेठेच्या मिथकांचा पर्दाफाश करतात. ट्रेडर्सना बाजारातील यादृच्छिक परिणामांच्या पलीकडे पाहण्यास, जोखमीची खरी वास्तविकता समजून घेण्यास आणि सर्व स्टॉक अनुमानांवर नियंत्रण ठेवणार्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचे मार्गदर्शन करण्यास शिकवतात. ट्रेडिंग इन द झोन बाजाराला नवीन मानसिक परिमाणाची ओळख करून देतो. अभूतपूर्व नफ्यासाठी ट्रेडिंग इन द झोनच्या शक्तीचा फायदा करून घ्या.
मार्क डग्लस हे १९९० मध्ये प्रकाशित झालेल्या ’द डिसिप्लिन्ड ट्रेडर : डेव्हलपिंग विनिंग अॅटिट्यूड्स’ या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी ’ट्रेडिंग सायकोलॉजी’ या संकल्पनेशी गुंतवणूक उद्योगाची ओळख करून दिली. मार्कने १९८२ मध्ये ट्रेडर्सना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि गुंतवणूक उद्योग, तसेच वैयक्तिक ट्रेडर्ससाठी ट्रेडिंग सायकॉलॉजी या विषयावर चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे सुरू ठेवले आहे. ते जगभरातील, तसेच अमेरिकेतील या विषयावरील चर्चासत्रांमध्ये वक्ते म्हणून काम करत आहेत. ट्रेडर्सना सातत्याने यशस्वी कसे व्हायचे ह्याची शिकवण ते अविरतपणे देत आहेत. सध्या ते त्यांच्या तिसर्या पुस्तकावर काम करत असून, त्याबद्दलची माहिती तुम्ही त्यांच्या ुुु.ारीज्ञर्वेीसश्ररी.लेा या संकेतस्थळाच्या माध्यमातून घेऊ शकता।





Reviews
There are no reviews yet.