Shivgandha

Sale!

Shreemadh Bhagvad Gita Karmyog | कर्मयोग

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Category:

दुसऱ्या अध्यायाच्या आस्वाद अनुभवातून करुणा, चेतना आणि तेज यांचा एक पवित्र अनुभव आपल्याला मिळत जातो. दुसऱ्या अध्यायातील जीवनवैभवाचे समग्र रूप, जीवनार्थ तसेच त्यातील (मोजक्याच) श्लोकांचे आस्वादन शब्दात पकडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. भगवद्गीतेतील दुसरा अध्याय हा अवर्णनीय, अस्फुट आणि विशुद्ध, दैनंदिन मानवी (चरितार्थाच्या) जीवनगतीत वाटघाला येणाऱ्या नैराश्य-घालमेल-तडफड यांच्या पार पलीकडे आपल्याला घेऊन जातो. दुसऱ्या अध्यायात एक खुलेपणा आहे, पारदर्शकता आहे. तसेच जीवनाच्या सातत्याचे म्हणजे आत्म्याच्या अमरत्वाचे, कर्मयोगाचे तसेच कर्मकौशल्याचे दिग्दर्शन आहे. स्थिरबुद्धी-स्थितप्रज्ञ माणसाची श्रीकृष्णाने कथन केलेली लक्षणे अवर्णनीय व अफलातून आहेत. इतकेच नाही तर, ही दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला एका निवृत्तिशील विरागी मनाकडे घेऊन जाते.

माणसाच्या जाणिवेत मूलभूत परिवर्तन जोवर होत नाही, तोवर मानसिक ताणतणाव, संघर्ष आणि दुःख यांचे सावट मानवी जीवनावरून दूर होणार नाही. अपुऱ्या इच्छा-कामनेतून क्रोधाकडे, क्रोधाकडून मूढता-अविचाराकडे तसेच मूढतेकडून बुद्धीच्या म्हणजे ज्ञानशक्तीच्या नाशाकडे पर्यायाने अधःपतनाकडे आपण जाऊ लागतो. म्हणूनच इच्छा संयमित करुन-कामना तसेच आसक्ती, ममत्व आणि अहंकार यांचा जर आपण मोठ्या सजगतेने त्याग केला, तरच अनंतमयी शांततेच्या जीवनदृष्टीचा आपल्याला लाभ होऊ शकेल, असा भगवान श्रीकृष्णाचा सांगावा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shreemadh Bhagvad Gita Karmyog | कर्मयोग”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top