Shivgandha

Sale!

Lokmanya Tilak: Jeevanpravas anni Vichardhara

Original price was: ₹250.00.Current price is: ₹230.00.

Category:

भारताने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करावा आणि मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्नीशील रहावे, अशीही मते त्यांनी व्यक्त केलेली आढळतात.
लोकमान्य हे ग्रंथकार होते, तसेच थोर संपादकही होते. पत्रकाराने सामान्य लोकांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडावी व प्रसंगी त्यासाठी देहदंड सोसावा, अशी त्यांची पत्रकार म्हणून भूमिका होती आणि तसा त्यांनी तो सोसलाही होता असामान्य बुद्धिमत्तेच्या या लोकोत्तर पुरुषाला वस्तुतः गणित, तत्त्वज्ञान, इतिहास संशोधन अशा विद्वत्तेच्या क्षेत्रात अधिक रस होता. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला गीतारहस्य हा मराठी ग्रंथ आणि इंग्रजीतील द ओरायन आणि आर्क्टिक होम इन दि वेदाज या ग्रंथावरुन त्याची साक्ष पटते. परंतु कर्तव्यबुद्धीनेच त्यांनी आपले आवडीचे विषय बाजूला ठेवून आणि सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करुन, हालअपेष्टा व देहदंड सोशीत स्वराज्याच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. स्वराज्याच्या पुढील लढ्याची तयारी त्यांनी इ.स.१९२०  पर्यंत करून ठेवली होती. ते मुंबई येथे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन पावले. त्यांच्या राष्ट्रकार्यातून जगातील अनेक परतंत्र देशांना पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Lokmanya Tilak: Jeevanpravas anni Vichardhara”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top