पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर अब्दालीच्या भीतीने काही मराठी युद्धकैदी पानिपतच्या आजूबाजूच्या भागात, हरियाणातील दाट जंगलामध्ये लपून राहिले. वातावरण शांत झाल्यावर हळूहळू ही माणसं बाहेर पडून, जवळपासच्या गावांमध्ये राहू लागली आणि पाहता पाहता हरियाणातल्या समाजात मिसळून गेली. स्थानिकांना ही माणसं आदिवासींचा राजा रोड याचे वंशज असावेत असं वाटल्याने त्यांना ‘रोड मराठा’ असं म्हटलं जाऊ लागलं. तिथे ते प्रथम नोकरचाकर म्हणून काम करू लागले, पण मुळातच शेती, दुग्धव्यवसाय, धातुकाम, कलाकुसर यांमध्ये पारंगत असल्याने त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादित करून पुढे प्रगती साधली.
रोड मराठ्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, प्रचंड कष्ट, गुलामासारखं त्यांचं जिणं याचं चित्रण या कादंबरीत लेखकाने प्रभावीपणे केलं आहे. तसंच स्वातंत्र्योत्तर काळात रोड मराठा समाजाने साधलेल्या विकासाचे चित्रणही मनोवेधकपणे रंगवलं आहे. आजही काही मराठी चालीरीती, परंपरा ते कशा पाळतात याचं रोचक वर्णन कादंबरीत वाचायला मिळतं.





Reviews
There are no reviews yet.